जगदंबा माता महिला योगा ग्रुप स्नेहनगर इटावा वार्ड पुसदतर्फे देवी भागवत कथा ज्ञानयज्ञ व हरिनाम सप्ताहाचे आयोजन..

पुसद : जगद्गुरु संत शिरोमणी सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुसद येथील इटावा वॉर्ड येथे माँ जगदंबा देवी मंदिर परिसरात दिनांक ८ फेब्रुवारी २०२५ ते १५ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत श्रीमद देवी भागवत कथा ज्ञानयज्ञ व हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. ह.भ.प. महेश महाराज देगलुरकर यांच्या मधुर वाणीतून कथांचे रसपान होणार आहे.

सप्ताहादरम्यान दररोज सकाळी ५ ते ६ काकडा भजन, दुपारी १ ते ४ देवी भागवत कथा, सायंकाळी ५.३० ते ७ हरिपाठ आणि रात्री ८ ते १० हरिकीर्तन व नंतर हरिजागर होईल. विविध दिवसांसाठी विविध भजनी मंडळांचे आयोजन करण्यात आले आहे,
ज्यात ह.भ.प. नागनाथ महाराज ढवळे (पिंपळगाव मुंगशी), ह.भ.प. पंढरीनाथ महाराज (चिखलीकर), ह.भ.प. डॉ. दिनकर महाराज बाजड (पुसद) आदींचा समावेश आहे.
शनिवार, १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता संत सेवालाल महाराज यांची पालखी मिरवणूक निघेल. सकाळी १० वाजता ह.भ.प. महेश महाराज देगलुरकर यांचे काल्याचे कीर्तन होईल आणि ह.भ.प. कैलाश महाराज गायमुखनगर यांच्या हस्ते संत सेवालाल महाराज यांचा पाळणा व आरती होईल. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात संदीप शिंदे (वापटी), आकाश उघडे, विनायक घावस यांसारखे गायक, उत्तम महाराज चिखलीकर (तबला), जनार्धन महाराज चिखलीकर (हार्मोनियम) आणि करण टाळकुटे (पखवाज) हे कलाकार आपली कला सादर करतील.
जगदंबा माता महिला योगा ग्रुप स्नेहनगर व इटावा वार्ड परिसरातील सर्व मान्यवर मंडळी, पुसद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.