शिवशौर्य गाथा सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या दर्जेदार अभिनयाने शिवप्रेमी मंत्रमुग्ध..

शिवजन्मोत्सव २०२५
पुसद (शहर प्रतिनिधी ) छत्रपती शिवराय जन्मोत्सव समिती तर्फे आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या कालच्या दुसऱ्या दिवशी विविध ११शाळांतील विद्यार्थ्यांनी शिवशौर्य गाथा सांस्कृतिक कार्यक्रमात दर्जेदार अभिनय सादर करून उपस्थित शेकडो शिवप्रेमींना मंत्रमुग्ध केले.
भारती मैंद नागरी सहकारी पतसंस्थाद्वारे प्रायोजित या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार एड. निलय नाईक यांनी बोलतांना कोणत्याही क्षेत्रात जिंकलो तर विजय पचवायची शक्ती आणि पराभूत झालो तर पराभव स्वीकाराची ताकद पाहिजे हा गुणमंत्र छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हा लोकांना दिल्याचे सांगून शिवजन्मोत्सव आयोजनाची प्रशंसा केली.

प्रास्ताविक शिवजन्मोत्सव समितीचे प्रा. अजय क्षीरसागर यांनी केले. यावेळी विचापीठावर शिवजन्मोत्सव समितीचे प्रमुख मार्गदर्शक शरद मैंद, अनिरूद्ध पाटील, विजय जाधव,डॉ अमोल मालपाणी, डॉ सतिष चिद्धरवार, ,विजय जाधव,महेश खडसे, प्रा.नरेंद्र जाधव, पंजाबराव भोयर, साहेबराव ठेंगे, स्पर्धेचे परीक्षक ललीत सेता यशवंत देशमुख,अमित बोजेवार, साहेबराव राठोड आदी उपस्थित होते.
संचालन अमोल शिंदे व किरण देशमुख यांनी केले शिवकालीन न्यायाची सनद, अफझल खानाचा वध, पावन खिंड लढाई, तानाजी मालुसरे चे बलिदान, शिवरायांचा पाळणा, पोवाडा,मुघलांच्या आक्रमाणापूर्वी व नंतरचा महाराष्ट्र आदी प्रसंग सादर करून विद्यार्थ्यांनी उपस्थितांची वाहवा मिळविली.


विजेत्यांमध्ये श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या गुरूकुल स्कुलने ७हजार रु. चे पहिले,विद्यालंकार्स पोदार स्कुलने ६हजार रु. चे दुसरे, मुंगसाजी शाळेने ५हजार रु. चे तिसरे, ज्योतिर्गमय शाळेनी ४हजार रु चे चौथे,ओएसिस शाळेने ३हजार रु चे पाचवे, लोकहीत शाळेने २हजार रु चे सहावे बक्षिस प्राप्त केले.तर मातोश्री विद्यालय श्रीरामपूर, शकुंतलाबाई देशमुख विद्यालय, मातोश्री पार्वती नाईक कॉन्व्हेंट, कोषटवार विद्यालय व नवजीवन इंग्लिश मिडीयम स्कूल यांना १५००रु प्रोत्साहन पर बक्षीस देण्यात आले.
सादरीकरणात अफझल खानाचा वध, पावन खिंड लढाई, तानाजी मालुसरे चे बलिदान, शिवरायांचा पाळणा, पोवाडा,
मुघलांच्या आक्रमाणापूर्वी व नंतरचा महाराष्ट्र आदी चे दर्शन विद्यार्थ्यांच्या कलाविष्कारातुन शिवप्रेमींना पाहायला मिळाले .