माणुसकीची भिंत उपजिल्हा रुग्णालय मदत केंद्र,पुसद येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी…

रुग्ण त्यांचे नातेवाईक व पुसदमधील बेघर गरजूं महिलांना लुगडे व साड्या तसेच पुरुषांना रुमाल, व भोजन आणि फळवाटप
माणुसकीची भिंत उपजिल्हा रुग्णालय मदत केंद्र,
पुसद येथे रयतेचे राजे “छत्रपती शिवाजी महाराज” यांच्या जयंतीनिमित्त सर्व प्रथम त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी अतिशय कमी वयात आपली जबाबदारी समजून अन्याय अत्याचारा विरुद्ध आवाज उठवुन स्वराज्यासाठी कार्य केले.
परस्त्री मातेसमान मानत, महिलांना सन्मानाने वागवणारे “मातृभक्त, नारीरक्षक” छत्रपती शिवराय! खऱ्या अर्थाने ते “लोकराजे” होते ,कारण ते धर्म आणि जातीच्या पलीकडे जाऊन सुखी जनतेचे स्वप्न पहात होते.

छत्रपती शिवाजी महाराज, तसेच कर्मवीर संत गाडगेबाबा अशा थोर पुरुषांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून माणुसकीची भिंत, नेहमी पुसद मध्ये समाज उपयोगी उपक्रम राबवून समाज कार्य करत असते.
गरजवंतांना कपडे वाटप, उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे दोन वेळेस रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोफत अन्नदान,रुग्णांना मदत, निराधार मुलांना सणानिमित्य उपयुक्त व आवश्यक वस्तू देणे, रक्षाबंधन,दिवाळी व भाऊबीज गरजवंतासोबत साजरी करणे, वृद्धाश्रमात जाऊन सण साजरे करणे,ज्यांचे घर जळाले आहे.
त्यांना आवश्यक त्या वस्तूंची मदत करणे,असे वेगवेगळे उपक्रम राबवून माणुसकीची भिंत नेहमी समाजकार्य करत असते.
माणुसकीची भिंत उपजिल्हा रुग्णालय मदत केंद्र, पुसद येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रुग्णांच्या नातेवाईकांना व गरजवंतांना मोफत जेवण व फळवाटप करण्यात आले तसेच महिलांना साडी, लुगडे, व पुरुषांना उन्हापासून बचाव होण्याकरिता रुमाल वाटप करून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे या कार्यक्रमास उपस्थित मान्यवर -रमेश डंबोळे ,मंगेश भगत,स्वातीताई मंगेशराव भगत, वैष्णवी जाधव,गौरी जाधव, प्रकाश येल्हेकर,नंदकुमार खैरे ,विठ्ठलराव शेवाळे,जयसिंग राठोड ,जय जाधव ,शशिकांत देऊळकर, संतोष हराळ ,समाधान शिंदे ,संतोष तिजारे,पंजाब दातकर, संतोष तडकसे,तसेच माणुसकीच्या भिंतीचे अध्यक्ष गजानन जाधव, पंजाबराव ढेकळे,अनंता चतुर, सोनू पाटील, शिवराम शेटे, आदित्य जाधव ,संस्कृती बनसोड,धनंजय आघाम,दीपक घाडगे व माणुसकीची भिंत शुभचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होत.