मधुकर नगर येथील टीन शेड सभा मंडपाचे निकृष्ट बांधकामाविरोधात दिनांक 17 फेब्रुवारी पासून बेमुद्दत उपोषण सुरु,

उपअभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग पुसद यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह,
पुसद तालुक्यातील ग्राम पंचायत गायमुख नगर अंतर्गत येत असलेल्या मधुकर नगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिसरात ग्रामपंचायतीच्या वतीने पंधरावा वित्त आयोग या निधीतून टीन शेड सभा मंडपाचे बांधकाम केले आहे
परंतु सदर काम हे इस्टिमेट प्रमाणे न झाल्याने व निकृष्ट दर्जाचे बांधकाम झाल्याचा आरोप मधुकर नगर येथील सामाजिक कार्यकर्ता व तंटामुक्ती अध्यक्ष दत्ता गंगाराम गायकवाड ,व सामाजिक कार्यकर्ता श्रीधर प्रकाश पाटील यांनी केले असून याबाबत चौकशी करण्यासाठी संबंधित विभागाचे अधिकारी यांना अनेक वेळा तोंडी व लेखी तक्रारी केल्या आहेत

परंतु उपअभियंता जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग पुसद यांनी कोणतेही प्रकारची कारवाई केली नाही, त्यामुळे व्यतित होऊन संबंधित उपोषणकर्ते यांनी लोकशाही मार्गाने न्याय मिळवण्यासाठी दिनांक 17 फेब्रुवारी 2025 पासून जिल्हा परिषद बांधकाम उप विभाग पुसद कार्यालय समोर उपोषण सुरू केले आहे,

संबंधित उपोषणकर्ता यांच्यानुसार डॉ बाबा साहेब आंबेडकर पुतळा परिसरात, मधुकर नगर येथे करण्यात आलेल्या या टीन शेड सभा मंडप बांधकामा साठी एकूण 5 लाखाची रक्कम मंजूर करण्यात आली होती, व तसे अंदाजपत्रक ही बनविण्यात आले होते परंतु सदर काम हे दोन ते अडीच लाख रुपयांमध्येच आटोपण्यात आला आहे, त्यामुळे संबंधित सर्व अधिकारी यांचे हात ओले झाले की काय असा प्रश्न निर्माण झाल्याचा संशय उपोषणकर्ते दत्ता गंगाराम गायकवाड यांनी व्यक्त केला आहे,
ग्रामपंचायत हद्दीत कोणतेही विकास काम सुरू असताना संबंधित कंत्राटदार हे काम योग्य प्रमाणे करीत आहे की नाही हे पाहण्याची संपूर्ण जबाबदारी ग्रामपंचायतचे अधिकारी व पदाधिकारी यांची असते परंतु कमिशनच्या लालचापोटी संबंधित ग्रामपंचायतचे पदाधिकारी सरपंच हे संबंधित कंत्राटदाराच्या भ्रष्टाचाराला खतपाणी घालत असल्याचा दिसून येत आहे, व तसेच शासनाच्या करोडो रुपयांच्या निधीला चुना लावण्याचा काम हे करीत आहे,
त्यामुळे सदर प्रकरणी तात्काळ चौकशी न झाल्यास सदर ठिकाणी सुरू असलेल्या उपोषणला आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा उपोषणकर्ते दत्ता गंगाराम गायकवाड, श्रीधर प्रकाश पाटील यांनी दिला आहे,