जलदिनानिमित्त ग्रँड मराठा फाउंडेशन च्या ग्रामविकास प्रकल्पाचे उद्घाटन…
ग्रँड मराठा फाउंडेशन या गैरसरकारी संस्थेने यवतमाळ जिल्ह्यातील पुसद केळापूर आणि उमरखेड तालुक्यातील गरजवंत घटकाच्या विकासासाठी राबविलेल्या ग्रामविकास प्रकल्पाचे आज उद्घाटन करण्यात आले.
सदर प्रकल्प अंतर्गत ग्रँड मराठा फाउंडेशनने आपल्या दर्जेदार शिक्षण,आरोग्य, ग्रामीण आणि कृषी क्षेत्राच्या विकासासोबतच गरजवंत समुदायाचे सक्षमीकरण करण्याचा आपला संकल्प अधोरेखित केला आहे.
ग्रँड मराठा फाउंडेशनचे संस्थापक श्री रोहित शेलाटकर आणि ग्रँड मराठा फाउंडेशनच्या विश्वस्त श्रीमती माधवी शेलाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प राबविण्यात आला आहे,सदर प्रकल्प अंतर्गत खालील उपक्रम राबविण्यात आले,
१)शुद्ध पेयजलपुरवठा
आरोग्य आणि स्वच्छता उपक्रम अंतर्गत पुसद तालुक्यातील ,लोणदरी आणि पिंपळखुटा,उमरखेड तालुक्यातील कोरटा, खरूस,मोरचंडी तसेच केळापूर तालुक्यातील मालेगाव आणि वसंतनगर येथे वॉटर आरो आणि एटीएम बसविण्यात आले.
२) शैक्षणिक साहित्य वाटप तसेच शालेय इमारतीचे नूतनीकरण
ग्रँड मराठा फाउंडेशनने आपल्या दर्जेदार शिक्षण प्रकल्पांतर्गत पुसद आणि उमरखेड तालुक्यातील शाळांमध्ये दप्तर आणि वह्याचे वाटप तसेच जिल्हा परिषद शाळा वेडुळ (नवी आबादी)येथे शालेय इमारतीचे नूतनीकरण करण्यात आले.
ग्रँड मराठा फाउंडेशनचे संस्थापक श्री रोहित शेलाटकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले,ग्रँड मराठा फाउंडेशन नेहमीच दुर्बल घटकांचा सर्वांगीण विकास करून त्यांना चांगल्या सुविधा आणि शिक्षणाद्वारे उन्नत करण्यासाठी कटिबद्ध आहे.
शेतकरी आत्महत्या थांबवणे व कृषी क्षेत्राच्या विकासात येणाऱ्या त्रुटी दूर करून महाराष्ट्रातील शेतकरी समृद्ध करणे,हे ग्रँड मराठा फाउंडेशनचे उद्दिष्ट आहे.
सोबतच त्यांना शुद्ध पेयजल आणि त्यायोगे आरोग्य याचे महत्त्व स्पष्ट केले.
३)कृषी क्षेत्राचा विकास शिवप्रभा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून अनेक गरजवंत शेतकऱ्यांना बियाणे व खताचे तसेच सूक्ष्मवित्त पुरवठा उपक्रमाद्वारे आर्थिक दृष्ट्या मागास शेतकऱ्यांना सबळ करण्याचे काम केले आहे,
४) महिला सबलीकरण
विधवा महिलांना शिलाई मशीनचे वाटप करून त्यांना उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण काम मराठा फाउंडेशन ने केले आहे,
ग्रँड मराठा फाउंडेशन विषयी:-
ग्रँड मराठा फाउंडेशन ची स्थापना सन 2013 मध्ये कृषी क्षेत्रात सकारात्मक आणि शाश्वत बदल घडविण्याच्या उद्देशाने करण्यात आली,
ग्रँड मराठा फाउंडेशनच्या वतीने शेतकऱ्यांना सर्वांगीण शैक्षणिक पाठबळ पुरवले जाते,त्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची योग्य किंमत समाविष्ट असो शेतकऱ्यांच्या पाठी लागलेले कर्ज व गरीबीचे दुष्टचक्र मोडीत काढून त्यांना चांगल्या आयुष्याची संधी उपलब्ध करून देण्यात येते, ग्रँड मराठा फाउंडेशनच्या वतीने विशेष लक्ष हे विदर्भावर देण्यात आले .
असून, शेतकऱ्यांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून आर्थिक सहाय्य देऊ करण्यात येते. त्याचप्रमाणे कृषी पट्ट्यात व ग्रामीण भागात शेती पूरक क्रियाकलाप राबवुन विधवा महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला जातो, शाळांना संगणक दान करून त्यांनी ई लर्निंग ला प्रोत्साहन देत आहे,
हे फाउंडेशन महाराष्ट्रातील अकोला, अमरावती,यवतमाळ,चंद्रपूर आणि नागपूर भागात शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांच्या सर्वांगीण विकासाकरिता प्रयत्नशील आहे,त्यांना नियमित आयुष्यात सतावणाऱ्या समस्या कमी करून त्यांचे जीवन समृद्ध करायचे आहे.
शेतकऱ्यांना आगामी काळासाठी तयार करण्याचे त्यांचे ध्येय आहे. या कार्याच्या यशस्वीतेसाठी शिवप्रभा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे उपाध्यक्ष परशुराम नरवाडे, पिंपळखुटाचे सरपंच रणवीर पाटील, गुलाबराव गायकवाड, कोरटा राजू तिल्हेवाड, मोरचंडीचे ज्ञानेश्वर ठाकरे, खरुसचे संतोष तुपेकर, वैभव गाडेकर,लोणदरीचे सरपंच अरविंद शेळके, देवानंद इंगळे, राजाराम शेळके, नंदकिशोर इंगळे, संतोष गावंडे, दिग्विजय गायकवाड,सोहम नरवाडे,अविनाश इंगळे,गजानन आगोशे, सुरेश इंगळे व ग्रँड मराठा फाउंडेशनचे ऋषभ गोरे व प्रज्वल यांनी कार्य केलेले आहे,
या कार्यक्रमाकरिता अनेक ग्रामस्थ उपस्थित होते,या कार्यक्रमाचे आभार प्रज्वलने मानले.