राजस्थानी महिला मंडळ तर्फे गणगौर उत्सव साजरा…
पुसद येथील राजस्थानी महिला मंडळ तर्फे गणगौर हा पारंपरिक राजस्थानी सण मोठ्या उत्साहात राधाकृष्ण मंदिर येथे संपन्न झाला.
मुख्यतः हा कुमारिका व महिलांचा सण असून यात शंकर पार्वती यांची आराधना केली जाते व त्यांच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून १६ दिवस साजरा करण्यात येतो.
यात शंकरा प्रमाणे पती आपणास मिळविण्यासाठी गौरी पार्वती प्रमाणे आराधना केली जाते.
राधाकृष्ण मंदिराच्या प्रांगणात गणगौर गोठ हा उत्सव मोठ्या संख्येने साजरा करण्यात आला. या प्रसंगी निरनिराळ्या स्पर्धा आयोजीत करण्यात आल्या होत्या. यात मनाओ त्योहार या स्पर्धेत ६० महिलांनी सहभाग घेतला होता.
त्यात विविध सणाच्या आकर्षक झांकी पाहून दर्शक मोहित झाले. नारीशक्तीच्या अनाहत ऊर्जा आणि चैतन्याने परिपूर्ण या कार्यक्रमात गौरी – इसर म्हणजेच शंकर – पार्वतीच्या भक्तीभावाने सर्व वातावरण भक्तिमय झाले.
नवीन पिढीसाठी सणांचे महत्व व आस्था जागरूक होण्याच्या उद्देशाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
समाजाला सणांचे उदभोधन संदेश देऊन संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी राजस्थानी महिला मंडळचा हा पुढाकार होता.
या प्रसंगी राजस्थानी महिला मंडळ अध्यक्षा शिल्पा गठ्ठाणी यांनी माजी अध्यक्षा बेबी जांगिड यांचा त्यांच्या प्रदीर्घ सेवेबद्दल सत्कार केला.होली त्योहार सादर करणाऱ्या टीमला प्रथम क्रमांक रू.१५००, गणगौर टीमला रू.११००, तिज प्रस्तुत करणाऱ्या टीमला ७०० रू. तसेच जन्माष्टमी व करवा चौथ सादर करणाऱ्या टीमला उत्तेजनार्थ ५०० रू. बक्षिसे देण्यात आली.
दिग्रस येथील मंगल करवा व मंजरी मोदानी या स्पर्धा परीक्षक होत्या.राजस्थानी महिला मंडळ अध्यक्ष शिल्पा गट्टानी ,सचिवा ज्योती हेडा, कोषाध्यक्ष मनीषा मालपाणी तसेच कार्यक्रम संयोजक सोनाली पोद्दार, शोभा बुब ,चंदा भंडारी, मंजू जाजू, यांच्या परिश्रमाने व सर्व कार्यकारिणीच्या प्रयत्नाने हे आयोजन यशस्वीरीत्या व्यवस्थित पार पडले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कमला मालपाणी, प्रेमा बियाणी, लिला भंडारी, डॉ शशी जाजू, अरुणा बजाज, प्रीती गट्टानी, सुषमा अग्रवाल, आशा बजाज इत्यादींनी पुढाकार घेतला.
कार्यक्रमाची सांगता रात्री-भोज होऊन संपन्न झाला. याचा लाभ २५० पेक्षा अधिक महिलांनी घेऊन आनंद घेतला..