पुसद येथे महाराष्ट्र योग शिक्षक संघातर्फे जागतिक योग दिवस संपन्न…
महाराष्ट्र योग शिक्षक संघा तर्फे येथील वानरे मंगलं,लक्ष्मी नगर पुसद येथील भव्य सभागृहात दहावा जागतिक योग दिवस मोठ्या प्रमाणात उत्साहाने साजरा करण्यात आला. यावर्षी महीला सबलीकरणासाठी योग हे शासनाचे घोष वाक्य होते.
सर्व योगसाधक शुभ्र वेषात हजर होते. कार्यक्रमाची सुरुवात महर्षी पतंजली च्या प्रतिमा पूजनाने झाली. या प्रसंगी तन्मय मडके यांनी शंखनाद केला.
त्यानंतर शासकीय प्रोटोकॉल प्रमाणे योग राज्य अध्यक्ष डॉ. मनोजनिलपवार, राज्य सचिव प्रवीण मस्के
राज्य मार्गदर्शन मंडळाचे सदस्य वसंत काळेकर, जिल्हा महिला प्रकोष्ट प्रभारी कल्पना मस्के,जिल्हा सचिव शीतल मडके यांनी करून घेतला. यात सूर्यनमस्कार प्रवीण मस्के यांनी उत्तमरित्या घेतला.
योगात आसने,प्राणायाम व ध्यान सर्वांनी उत्तमरित्या करून आनंद व्यक्त केला.
यानंतर स्वागत समारंभ संपन्न झाला.
या प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे समाजभूषण दीपक आसेगावकर, विजया आसेगावकर, राज्य अध्यक्ष डॉ .मनोज निलपवार,अध्यक्ष वकील संघ ऍड रवी रुढे,उपाध्यक्ष वकील संघ अंबिका काळे, जिल्हा संघसंचालक डॉ पंकज जैस्वाल, अध्यक्ष पत्रकार संघ अनिल चेंडकाले, अध्यक्ष माणुसकीची भिंत गजानन जाधव, सचिव बार असोसियेशन ऍड वीरेंद्र राजे,महाराष्ट्र धनगर संघटनेचे प्रा.वैभव पाटील,जिल्हा अध्यक्ष शरद बजाज इत्यादी हजर होते.
सर्व मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या प्रसंगी दीपक आसेगावकर यांनी साऊंड सिस्टीम योगसंघाला भेट दिली. किरण गवळी यांनी योग गीत सुमधुर आवाजात गायीले. दीपक आसेगावकर यांनी आपल्या संबोधनात पुसद चे महाराष्ट्र योग शिक्षक संघ महाराष्ट्रात योगाचे नेतृत्व करीत आहे.
यापूर्वी मुख्यमंत्री वसंतराव नाईक व सुधाकरराव नाईक यांनी नेतृत्व केले होते
असे सांगितले. या प्रसंगी ग्रीन मिशन संघटना अध्यक्ष पवन बोजेवार, विश्वकर्मा मंडळ नींबी चे गजानन पैठणकर, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ आदर्श शेतकरी पुरस्कार प्राप्त शिवराम शेटे, अहिल्यादेवी होळकर पतसंस्था अध्यक्ष अशोक मस्के,एम.सी. एल .अध्यक्ष जगदीश पायघन, पत्रकार प्रा.प्रकाश लामने यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्य उपाध्यक्ष मनोज नाईक यांनी केले. आभार ऍड बाबुराव मस्के यांनी मानले.
या कार्यक्रमाला प्रा. गोविंद फूके,विलास पलिकोंडावार, भास्कर व्यवहारे, प्रा.प्रमोद हरणे,संतोष वंजारे,राजू सोनूने,संभाजी गवळी, डॉ अमोल खांदवे,शिवदास महाजन,दादाराव हातमोडे,अमर चंदन,गणेश पागिरे,बालाजी माने, निर्मला सातपुते,माया काळेकर,वंदना कदम, योगिता जांबुतकर,वैशाली दुबे, अलका मंडाले,दुर्गा गवळी, विजया चव्हाण,अर्चना पडघणे,किरण नाईक, मनोरमा मनवर, उज्जवला तलणकर,ओंकार जाधव, रंजीता कननावार, उषा जाजु,विद्या गायकवाड,राणी गायकवाड, स्वरूपा चक्करवार,संध्या तगडपल्लेवार,पल्लवी पौल, वैजू वट्टमवार,सुलोचना हातमोडे,शिला करपते, सुनंदा पवार इत्यादी योगसाधक हजर होते.