मानव विकास परिषद महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष बळवंतराव मनवर यांचे सार्वजनिक बांधकाम विभाग पुसद कार्यालया समोर उपोषणाचा पहीला दिवस..!!
_______आमदार,खासदार निधी 25/15 मधील चौकशी न झाल्यास अमरण उपोषणाचा पवित्रा घ्यावा लागेल असा इशारा..!!
दिनांक15/07/2024 पासुन सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालया समोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. सदरील तक्रार दि.27/06/24 रोजी दिली होती.
आणी त्यानंतर तक्रारकर्ते बळवंत मनवर यांनी चौकशी संदर्भात दि.10/07/24 रोजी परत सुचना पत्र सुध्दा दिले की अद्याप कोणत्याही प्रकारे सुध्दा चौकशी करण्यात आली नसुन त्याअनुषंगाने तक्रारकर्ते यांना ना इलाजास्तव उपोषणाचा पवित्रा द्यावयास भाग पाडले.
सविस्तर असे लक्षात येते की उपअभियंता,जेई,कंत्राटदार,व सचिव यांच्या संगणमंतानीच हा सावळा गोंधळ चालत असल्याचे जनमानसात चर्चेला उधान येत आहे.अश्या या भ्रष्ट वृतीच्या व कमीशन खाणाऱ्या अधिकाऱ्याची सखोल चौकशी होने काळाची गरज आहे.
वास्तव्य आहे की कोणत्याही कार्यकर्त्यानी तक्रार केल्यास कोणत्याच तक्रारीची चौकशी केल्या जात नाही. कारण कोणताही अधिकारी धुतल्या तांदळाचा नाही.
त्यामुळे मि नाही त्यातली,,आणी कडी लावा आतली,,अश्यांतला प्रकार चालु आहे.
सदरील दिलेल्या तक्रारीची ८ दिवसाच्या आत चौकशी न झाल्यास व कार्यकर्ते बळवंत मनवर यांच्या मागण्या पुर्णपणे न झाल्यास अमरण उपोषणाचा पवित्रा घ्यावा लागेल..