उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य अजित दादा पवार ची जन सन्मान यात्रा 1 सप्टेंबर ला पुसद येथे येणार…
पुसद : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री श्री. अजित दादा पवार ह्यांची जन सन्मान यात्रा 1 सप्टेंबर ला पुसद येथे येणार असल्याची माहिती आज आ. अँड.इंद्रनील नाईक ह्यांनी शासकीय विश्राम गृहावर आयोजित पत्रकार परिषदे दिली.
राज्य सरकारने विविध योजनेच्या
माध्यमातून विकास पर्व सुरू केले आहे. त्यामध्ये लाडकी बहिण योजने मुळे महिला वर्गात आर्थिक आधाराला घेवून उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ह्या पार्शवभूमीवर अजित दादा मतदार संघातील जनतेशी संवाद साधणार आहे.
येत्या रविवार दिनांक 1 सप्टेंबर 2024 रोजी यूपी चाटच्या बाजूला पारध मैदानात ही सभा संपन्न होणार असल्याची महिती आमदार अँड. इंद्रनील नाईक ह्यांनी दिली.
त्यांनी पुसद विधानसभेतील झालेल्या विकासकामाचा लेखाजोखा मांडला…!
ह्या पत्रकार परिषदेला आ. श्री. अँड.इंद्रनील नाईक, बाळा साहेब कामरकर, भगवान अशोले इरफान भाई, कयुम भाई, प्रा संजय चव्हाण, प्रा. नरेन्द्र जाधव , अँड. सुनील ढाले, ऋषिकेश पंडितकर ह्यांच्या सह शहरातील पत्रकार बांधव उपस्थित होते..