पुसद येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने शरद पवार यांचा जाहीर निषेध..
पुसद येथे मागील काही दिवसापासून सातत्याने माहाविकास आघाडी व शरद पवार यांच्या पुढाकारातून हिंदू धर्मावर व हिंदूंच्या देव ,देवतावर व हिंदू धर्माच्या उपासना पद्धतीवर टीकाटिपणी केल्या जात आहे.
संभाजी ब्रिगेडच्या जाहीर सभेत शरद पवारांच्या उपस्थितीत हिंदू देवता बद्दल अपमानास्पद बोलले गेले त्याबद्दल शरद पवार चकार शब्द बोलले नाही पुणे येथे गणेशोत्सवात जो अथर्वशीर्षाचा कार्यक्रम घेतला जातो त्यामध्ये सर्व जातीपातीच्या हजारो महिला या पारायणास उपस्थित असतात याही वेळेस शरद पवाराचे कार्यकर्ते चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव या माणसाने सर्व गणेश भक्तांच्या, भगिनींच्या भावना दुखावल्या जातील अशा पद्धतीचं वादग्रस्त विधान केलं हा हिंदू द्वेष्टा या बायांना काही काम नाही आहे.
यांच्या डोक्यात फरक पडला अशा पद्धतीची निंदानालिस्ती करणारे वादग्रस्त विधान या माणसाने काढले हा शरद पवार यांचाच कार्यकर्ता जितेंद्र आव्हाड यांनी वादग्रस्त हिंदू देवता बद्दल विधान करून हिंदूंच्या भावना भडकविल्या व दुखावल्या स्वतः शरद पवार यांनी या देशातील कोट्यावधी रामा भक्ताच्या भावना दुखावल्या राम मंदिर बांधल्याने या देशातील कोरोना पळून जाणार का ॽ असा प्रश्न उपस्थित करून रामभक्ताच्या श्रद्धेला जखमी केले.
या स्वरूपाचे अनेक उदाहरणे शरद पवारांच्या नेतृत्वातील कार्यकर्ते, पदाधिकारी कडून बोलण्यात आले यामागे अल्पसंख्याक समाजाच्या मत पेटीला डोळ्यासमोर ठेवून हिंदूंच्या भावना दुखावल्या जात आहे.
आता यापुढे हिंदू हे सर्व सहन करणार नाही यासाठीच इशारा म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रात शरद पवारांचा हिंदू विरोधी व अल्पसंख्याक समाजाला खुश करण्यासाठी हिंदु धर्मावर टीका टिप्पणी करायची याचा निषेध म्हणून पुसद येथे नेताजी सुभाषचंद्र बोस चौकात सकल हिंदू समाजाच्या वतिणे 12 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता निषेध कार्यक्रम करण्यात आला .
याप्रसंगी प्रभू रामचंद्राच्या, छत्रपती शिवाजी महाराज, भारत माता, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा जयजयकार करून घोषणा देण्यात आल्या व शरद पवारांचा निषेध करण्यात आला.
ज्येष्ठ नेते विनोद जिल्हेवार, दीपक काळे, लक्ष्मणराव आगाशे,अजय पुरोहित, इत्यादी नेत्यांनी आपले मनोगत व्यक्त करून शरद पवारांचा जाहीर निषेध केला.हा निषेध नोंदविण्यासाठी खालील मान्यवर उपस्थित होते.
विनोद जिल्हे वार ॲड.उमाकांत पापीनवार,निखिल चीदरवार, अजय पुरोहित ,दीपक परिहार संजय बयास ,दीपक काळे ,सुरज डुबेवार ,दीपक उखळकर ,पंजाब भोयर ,लक्ष्मण आगाशे प्रतीक चव्हाण, निलेश पेन्शनवार, राहुल देशमुख, बाळासाहेब उखळकर, विक्रांत जिलेवार, पांडुरंग उतळे ,संतोष आर्य ,संतोष मुकेश ,अरुण जाधव, नंदकुमार चौधरी, विश्वजीत सरनाईक ,अरुण पवार, कैलास मस्के, सोपीनाथ माने ,अनिल चव्हाण,पांडुरंग कोथळे,अमर सोनटक्के ,नटवर उंटवाल,गजू मडके, भारत मोदी राज, मामा रायपूरकर नारायण,मुडाणकर ,बाबुराव पाईकराव, सुरज कुरील ,अरुण जाधव , हरीश चौधरी ,तेजस कान्हेर, कैलास मस्के,रमेश सोमानी, दीपक काळे, गोविंद कुकडे, गोपाल पांढरे ,आशिष चव्हाण, सुधाकर चव्हाण,किशोर काळे ,आकाश खडसे, विनोद मालू ,राज जाधव ,दत्ता बोराडे,अशोक नेमाडे ,अनिल तोंडारे, रामराव सोनवणे, व असंख्य हिंदू बांधव उपस्थित होते..