वाढदिवसा निमित्ताने सिकलसेलग्रस्त बालकांसाठी रक्तदान व आर्थिक मदत शिबिर……………….संगमित्रा महिला ट्रस्ट व मैत्रेय बुद्ध विहार समिती यांचा समाजाभिमुख उपक्रम
पुसद/ ब्लड लाईन डायरी ची संकल्पना साकारण्यासाठी अनमोल मार्गदर्शक असणारे मैत्रेय बुद्ध विहार समिती चे अध्यक्ष माजी सैनिक अरुणभाऊ पाईकराव यांच्या वाढदिवसानिमित्त संघमित्रा महिला ट्रस्ट व मैत्रेय बुद्ध विहार समिती लुम्बिनी नगर साई विहार कडीपुर पुसद यांच्या संयुक्त विद्यमाने सिकलसेलग्रस्त बालकांसाठी रक्तदान शिबिराचे आयोजना सोबतच आर्थिक मदतीचा हात देण्याचा संकल्प सुद्धा यावेळी साकारण्यात येणार आहे.
सिकलसेल ग्रस्त अनेक बालकांना दर महिन्याला रक्त चढवावे लागते व त्यावरच त्यांचे जीवन मरणाची लढाई चालू असते. आपल्या पुसद परिसरामध्ये मोलमजुरी, भांडीकुंडीच्या मजुरीतून दर महिन्याला लागणारा रक्तदाता व पैशाची जमवाजमव करणे अशक्य असणारे अनेक कुटुंब आहेत त्यांना एक मदतीचा हात देणे गरजेचे आहे याच उदात्त भावनेने नेहमी रक्तदानातून जीवदान देणारे माजी सैनिक अरुण पाईकराव यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी सिकलसेलग्रस्त रुग्णासाठी सपत्नीक रक्तदान करून या बालकांसाठी आर्थिक मदत करण्याचा संकल्प केला आहे. दिनांक 19 सप्टेंबर 2021 वार रविवार रोजी वेळ सकाळी दहा ते तीन वाजेपर्यंत मैत्रेय बुद्ध विहार गुणवंतराव शाळेच्या मागे कवडीपूर येथे रक्तदात्यांनी व आर्थिक मदतकारांनी दानासाठी उपलब्ध राहावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
या समाजाभिमुख रक्तदान शिबिराचे उद्घाटन लोकप्रतिनिधी आमदार इंद्रनील नाईक यांच्या हस्ते व निंबी कवडीपुर चे सरपंच मयूर राठोड, श्रीरामपूर चे सरपंच आशिष काळबांडे, सहाय्यक गटविकास अधिकारी शिवाजी गवई, सहयोगी अधिष्ठाता दुग्ध तंत्रज्ञान वरूड चे प्रशांत वासनिक, स्पंदन हॉस्पिटल चे डॉक्टर राहुल भगत, नागेश कॅम्पुटर प्रतिष्ठानचे मिलिंद हट्टेकर, उद्योजक किशोर मुजमुले, डॉक्टर अनिल राठोड व सुनिल मोर यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
रक्तदात्यांनी विकास मनवर 8275399739, जितू प्रधान 9421769598, बाळासाहेब कांबळे 8999045645 यांना संपर्क करावा…