महाराष्ट्र योग शिक्षक संघातर्फे सेवानिवृत्ती बद्दल सत्कार..
पुसद , दिनांक ८-१२-२०२४
महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष तसेच कोषटवार विद्यालय येथील पर्यवेक्षक मनोज नाईक व वानरे मंगलं योग वर्ग येथील योगसाधक तसेच महागाव तहसील कार्यालयातील कर्मचारी दादाराव हातमोडे यांचा त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त येथील वानरे मंगलं योग वर्ग येथे सर्व योगसाधका तर्फे समारंभात सपत्नीक सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. गोविंद फुके तसेच प्रमुख पाहुणे राज्य अध्यक्ष डॉ मनोज निलपवार, योग फाऊंडेशन सचिव शरद बजाज,विलास पलिकोंडा वार,राज्य सचिव प्रवीण मस्के,जिल्हा सचिव वंदना कदम,जिल्हा महिला प्रकोष्ठ प्रभारी कल्पना मस्के,उत्तम कवाने, तालुका अध्यक्ष नारायण जाधव इत्यादी हजर होते.
कार्यक्रमाची सुरुवात अलका मंडाले यांनी स्वागत गीत गावून केली. नंतर सत्कार मूर्ती मनोज नाईक व पुष्पा नाईक तसेच दादाराव हातमोडे व सुलोचना हातमोडे या दाम्पत्याचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते शाल व श्रीफळ तसेच भेटवस्तू देऊन करण्यात आला. या प्रसंगी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले.
त्यात अध्यक्ष प्रा.गोविंद फूके यांनी मनोज नाईक हे एक योगरत्न व परीस असून त्यांनी शिक्षण क्षेत्रासोबत आरोग्य क्षेत्रात जनसामान्यात योग पोहचवून महत्वाचे कार्य केले आहे असे सांगितले.
डॉ मनोज निलपवार यांनी या योगवर्गात होणाऱ्या कार्यक्रमाचा आदर्श सर्व महाराष्ट्रात घेतला जातो. असे प्रतिपादन केले. सत्कार मूर्ती मनोज नाईक यांनी सेवानिवृत्तीनंतर चे उर्वरित आयुष्य सर्व महाराष्ट्रात योगकार्य वाढविण्यासाठी खर्च करणार असे प्रतिपादन केले.
कू.ऋतुजा हेडे यांनी योग शिक्षणामुळे अनेकांना रोजगारांच्या संधी उपलब्ध झाल्या असून शासनही त्याबाबतीत सकारात्मक आहे असे प्रतिपादन केले. तसेच शीतल मडके, वंदना कदम,कल्पना सोनोने,शांताबाई हातमोडे,नरेंद्र पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड बाबुराव मस्के तर आभार अविनाश महाजन यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाला योगसाधक शिवदास महाजन,अमर चंदन,गजानन भडंगे,राजू वंजारे,संभाजी गवळी,संभाजी चोपडे, उध्दव भगत, चक्रधर नरवाडे,सुमेध खंदारे, रंजना चव्हाण,संगीता नरवाडे,वैशाली दुबे,विद्या मस्के,विद्या गायकवाड,रंजना इंगळे,सीमा चव्हाण,ज्योती मस्के,मनोरमा मन्वर, छाया भगत, आशा भोरगे,दक्षता महाजन,निशा हातमोडे इत्यादी सहित अनेक योग साधक हजर होते.