महाराष्ट्र योगशिक्षक संघा द्वारे सूर्यनमस्कार कार्यक्रम..

पुसद, दिनांक २८-१-२०२५ :-
केंद्र व राज्य सरकारच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत महाराष्ट्र राज्य सरकारच्या धोरणानुसार संपूर्ण महाराष्ट्रात मकरसंक्रांती ते रथसप्तमी दरम्यान सामूहिक सूर्यनमस्कार सर्वांच्या आरोग्यासाठी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार महाराष्ट्र योग शिक्षक संघ संपूर्ण महाराष्ट्रात हे अभियान राबवित आहे.
पुसद तालुक्यात या योग शिक्षक संघातर्फे तालुका आरोग्य अधिकारी डॉ नामदेव सरकुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील वानरे मंगलं,लक्ष्मी नगर पुसद येथे एका भव्य कार्यक्रमात सकाळी सहा वाजता सामूहिक सूर्यनमस्कारचा कार्यक्रम उत्साहाने संपन्न झाला.कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे राज्य अध्यक्ष डॉ मनोज निलपवार,राज्य उपाध्यक्ष मनोज नाईक, योगा फाऊंडेशन चे सचिव व योगसंघाचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष शरद बजाज, राज्य सचिव प्रवीण मस्के, राज्य लीगल सेल प्रभारी ऍड बाबुराव मस्के, विलास पलिकोंडावार, प्रा. गोविंद फुके, शिवसेना नेते गणेश पागिरे, ज्येष्ठ योग साधिका शांताबाई हातमोडे मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून व योग महर्षी पतंजली यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
स्वागत गीत व योग गीत किरण ताई गवळी यांनी सुमधुर आवाजात गायीले.
स्वागत समारंभात डॉ नामदेव सरकुंडे यांची यांची पुसद तालुका आरोग्य अधिकारी म्हणून नुकतीच नियुक्ती झाल्याबद्दल तालुक्यातील आरोग्यवर्धिनी योगशिक्षकांच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व योगानुभुती हे योगसंघचे पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी डॉ नामदेव सरकुंडे यांनी आरोग्यवर्धिनी योग शिक्षकांना काही समस्या असल्यास मला कळवावे मी त्या नक्कीच त्वरित सोडविण्याचा प्रयत्न करेल असे आश्र्वासित केले.
तसेच तालुक्यातील आरोग्य ग्रामीण भागात योग शिक्षकांच्या सहकार्याने सुधारित आहे असे उदगार काढले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ मनोज निलपवार यांनी सूर्यनमस्कारचे महत्व सांगून हा एक सर्वांगीण व्यायाम प्रकार असून यामुळे कमीतकमी वेळेत संपूर्ण आरोग्य सुधारते तसेच शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक प्रगती होते तसेच शरीर लवचिक बनते, असे प्रतिपादन केले.
योगा फाऊंडेशन चे सचिव शरद बजाज यांचा वाढदिवस व पासष्टी असल्यामुळे सर्व योगसाधकांच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन अनेकांनी सत्कार केला.
कार्यक्रमाचे संचलन मनोज नाईक यांनी केले. आभार ऍड बाबुराव मस्के यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाला योगसाधक कल्पना मस्के,वंदना कदम,शीतल मडके,रंजना चव्हाण, लता देशमुख,अनिता हिरवे, अलका मंडाले, मनोरमा मनवर,स्नेहल खडसे,अनिता भसाखेत्रे,किरण नाईक, विद्या मस्के,गायत्री गडदे,दुर्गा गवळी,अर्चना पडघने, सुलोचना हातमोडे,पल्लवी पौळ, छाया भगत,ज्योती कांबळे, ज्योती कापुरे,निर्मला सातपुते, बा लाजी माने,दादाराव हातमोडे,संभाजी गवळी, दत्तात्रेय सूर्यवंशी, आकाश गवळी,अमोल गवळी,गजानन शेळके, योगेश पाली, प्रा.संजय पद्मावार ,सुभाष पवार, संध्या पवार इत्यादी सहित अनेक योग साधक, योग शिक्षक हजर होते.