जागतिक महिला दिनी महीलांनी दिला मोलाचा जागतिक संदेश..

वंदना विनोद बरडे सामाजिक कार्यकर्त्या
नागपूर- धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेमार्फत जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या
जागतिक महिला दिनानिमित्त धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेच्या वंदना विनोद बरडे सामाजिक कार्यकर्त्या व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महीला मंडळ अध्यक्ष यांच्या नेतृत्वात हा संदेश देण्यात आला.
हा संदेश नाटीका मार्फत आजच्या ज्वलंत समस्येवर आधारित आहे.
आजची ज्वलंत समस्या आहे मुलं मुली आईवडिलांना, सासु सासरे यांना म्हातारपणी वागवत नाही आणि त्यांना व्रुध्दाश्रमात जाव लागतं आणि त्यांची व्रुध्दाश्रमात कशी देखभाल केली जाते आणि असे किती तरी उदाहरणे व किस्से समाजात आहे.
याविषयावर हे १० मीनीटाची छोटी नाटीका बसवून मोठा संदेश यामार्फत देण्यात आला.आणी सर्व प्रेक्षकांना ह्रदय पिळून टाकणारी घटना प्रेक्षकांन समोर दाखवुन उपस्थित प्रेक्षक ढसाढसा रडले.
जे रडले ते कमीत कमी आपल्या आईवडिलांना सासु सासरे यांना म्हातारपणी व्रुध्दाश्रमात पाठवणार नाही असे म्हणाले आणि या ज्वलंत विषयावर नाटीका सादर केल्याबद्ल सर्वांनी भरभरून कौतुक केले.
आणी समाजाचा डोळा उघडणारे हे नाटक प्रत्येक घरी जावं आणि सर्वांनी मिळून मिसळून गुण्यागोविंदाने नांदत राहावं हाच उद्देश.
यामध्ये व्रुध्दाश्रमाचे ट्रस्टी ची भुमीका वंदना विनोद बरडे अधीसेवीका ऊप जिल्हा रूग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर यांनी तर व्रुध्दाश्रमात राहायला येणारी शारदा देवीची भुमिका ज्योती दिपक कापडे यांनी पुन्हा दुसरे व्रुध्दाश्रमात राहायला येणारे काकुडे यांची भुमीका अनिता त्रिकुट यांनी केली .
आणी गाणे व डान्स यांच्यासह न्रुत्र दाखवून विदारक चित्र तयार केले त्यामध्ये कलाकार संजीवनी घूरडे,मीनिक्षी लोकही, अर्चना बुंधे, वैशाली बीटे,संगिता खूजे,विद्या सोनाग्रे,या सर्वांनी या ज्वलंत विषयावर नाटीका सादर करुन एक मोठा संदेश दिला .
हा सोहळा गजानन महाराज मंदिर बालाजी नगर नागपूर येथे संपन्न
झाला.अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली.