योग वर्गात रक्षाबंधना निमित्त देण्यात आली अनोखी ओवाळणी…
पुसद
प्रतिनिधी सर्वधर्म समभाव असलेल्या अखंड भारतात रक्षाबंधन हा सण मोठया आनंदात व उत्साहात दरवर्षी साजरा करण्यात येतो परंतु या वर्षी कोविड कोरोना या विषाणू चा प्राधुरभाव वाढत चालल्याने कोविड कोरोना नियमाचे पालन करण्यात येऊन लक्ष्मीनगर पुसद येथे अखिल भारतीय योग शिक्षक संघ द्वारा योग वर्गात रक्षा बंधांनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी राष्ट्रीय संयुक्त सचिव मनोज नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली योग वर्गातील भगिनीनि श्रावण पौर्णिमा ,नारळी पौर्णिमा व रक्षाबधन असा कार्यक्रम घडवून आणला योग वर्गातील वर्ग शिक्षक तथा तालुका प्रभारी प्रवीण मस्के ,अविनाश महाजन ,दिगंबर चव्हाण ,विजय पाटील खंदारे ,गणेश पागिरे, गवळी सवनेकर,व योग वर्गातील बंधूंना योगवर्ग मधील भगिनी वंदनाताई कदम , योगीता जांबूतकर , श्रद्धा वानखेडे,लता देशमुख ,कल्पना ताई मस्के,संगीता ताई नरवाडे,गायकवाड ताई ,उज्वला ताई खंदारे पाटील,शिल्पाताई बजाज,रंजना ताई चव्हाण,कोमल चव्हाण,किरणताई नाईक यांनी योग वर्गात राख्या बांधून रक्षाबंधन दिन साजरा करण्यात आला तर या प्रसंगी योग शिक्षक मनोज नाईक यांनी बहिणीस ओवाळणी म्हणून मास्क चे वितरण करण्यात आले बहिणीस आगळी वेगळी ओवाळणी नाईक यांनी दिल्याने त्यांचे सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत केले असे मीडिया प्रभारी संजयकुमार हनवते सवनेकर यांनी कळविले आहे▪️▪️▪️▪️▪️▪️