विधवांना स्वयंपूर्ण व स्वाभिमानी जीवन जगण्यासाठी कायद्याच्या तरतुदींचा वापर करा :जिल्हा न्यायाधीश व्ही बी कुळकर्णी यांचे आवाहन…
: जिल्हा न्यायाधीश व्ही बी कुळकर्णी यांचे आवाहन
पुसद/ विधवा हया निराधार नाहीत, त्यांनासुद्धा स्वाभिमानाने जीवन जगण्या संदर्भात महत्त्वाची तरतूद कायद्यात आहे. विधवांना सुद्धा मोठ्या प्रमाणात अधिकार असल्याने त्या कायद्याच्या अधिकाऱ्याचा वापर करून स्वयंपूर्ण होण्याची गरज आहे. असे प्रतिपादन करीत विद्वान बद्दलच्या कायद्याची संपूर्ण माहिती कार्यक्रमाचे अध्यक्ष वसंत कुलकर्णी जिल्हा न्यायाधीश एक यांनी दिली.
माहिती अधिकारामुळे अधिकाऱ्यांना त्रास होतो ही भावना अधिकाऱ्यांनी काढून टाकावी. कायद्याचा संपूर्णपणे अभ्यास केल्यास हा कायदा सर्वांसाठी हितकारक आहे. असे प्रतिपादन करीत माहिती अधिकार कायद्याची कायदेशीर ज्ञान या कायदेविषयक ज्ञानदान शिबिरातून तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश क्रमांक एक व्ही बी कुलकर्णी यांनी दिले.
तालुका विधी सेवा समिती पुसद व बार असोसिएशन पुसद यांचे संयुक्त विद्यमानाने ०५ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी दोन वाजता जिल्हा न्यायालयाचे कॅन्टींग हॉल मध्ये कायदेविषयक ज्ञानदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा न्यायाधीश क्रमांक एक तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती पुसद चे व्ही.बी. कुलकर्णी हे होते.
कार्यक्रमाचे सुरुवातीला सहदिवाणी न्यायाधीश जी बी पवार यांनी विधवाचे मालमत्ता विषयक अधिकार या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. तर सह दिवाणी न्यायाधीश व्ही.एस . वाघमोडे यांनी विविध उदाहरणातून माहितीचा अधिकार कायदा 2005 च्या वापराबाबत सखोल माहिती दिली.
विधवांनी आता एखाद्यावर व्यक्तिगत किंवा संस्थेवर अवलंबून न राहता पतीच्या अधिकारा इतपतच तिलासुद्धा प्रॉपर्टीमध्ये अधिकार आहे. विधवा महिलांना स्वयंपूर्ण करणारी कायदे हे ज्ञानाची शिदोरी आहे. त्याचा उपयोग करा असे प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश वसंत कुलकर्णी यांनी अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना केले.
ते ते पुढे बोलताना म्हणाले की , स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये विधवांची परिस्थिती खूप खराब होती त्यांना एक प्रकारे वाळीत टाकल्या जात होते. त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात होते. त्यांना कोणत्याही सुख सुविधेपासून दूर ठेवल्या जात असल्याने त्या दुर्लक्षित घटकांमध्ये मोडत होते. कायदे तयार झाले नसल्यामुळे त्या न्याय मागण्यासाठी कुठेही जाऊ शकत नसल्याने त्या खितपतच पडत अन्याय सहन करीत गरीबीत जीवन जगत होत्या. परंतु त्यांच्या संपत्तीच्या अधिकाऱ्याचे कायदे स्वातंत्र्यानंतर निर्माण झाल्यावर त्यांच्यामध्ये स्वाभिमानाची व आपण निराधार नाही याची भावना आपोआपच तयार व्हायला लागली. परंतु अजूनही त्यांच्या हिताच्या कायद्याची बऱ्याच स्त्रियांना माहिती नाही. विधवा स्त्रियांचे काय अधिकार आहेत हे त्यांच्या पर्यंत पोचविणे हे कायदेविषयक जनजागरण करणाऱ्या सर्व स्वयंसेवकांचे आद्यकर्तव्य आहे. कारण विधवा स्त्रियांना देखील सभ्यतेच्या दृष्टीने अशा प्रकारे त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवणे म्हणजे त्यांच्यावर अन्याय करणेच आहे. त्यामुळे त्यांच्या अधिकाराविषयी अधिकची माहिती देण्याचे कार्य तालुका विधी सेवा समितीच्या मार्फत नियमित चालू असते अशी माहिती सुद्धा यावेळी अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना जिल्हा न्यायधिश व्ही बी कुलकर्णी यांनी दिली.
या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन ॲडव्होकेट अश्विनी जाधव यांनी तर उपस्थितांचे आभार पुसद वकील संघाचे सचिव ॲडव्होकेट संजय राठोड यांनी मानले. यावेळी सर्व न्यायाधीश मंडळी , सर्व वकील मंडळी व पक्षकार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.