जिजाऊ सृष्टी पुसद येथे शिव जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा….

माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन कडून गरजवंत विद्यार्थ्यांना मदत….
जिजाऊ सृष्टी पुसद येथे माणुसकीची भिंत सदस्याकडून शिव जन्मोत्सव सोहळा, गरजवंत मुलींना मदत करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला,यावेळेस प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व बाल शिवराय यांच्या मूर्तीचे पूजन करून शिवजन्मोत्सव निमित्य गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यात आली. माणुसकीची भिंतचे सदस्य हे गरजूंना नेहमीच मदत करत असतात, वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक कार्य करत असतात, असाच एक उपक्रम छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त ग्रामीण भागातील चार गरजवंत जिजाऊ च्या लेकीना शिक्षणासाठी सायकल प्रदान करण्यात आल्या, यामध्ये कुमारी पूजा संतोष कदम, वर्ग आठवा ज्ञानप्रकाश विद्यालय सुकळी जहागीर ता उमरखेड, आई-वडील दोघेही नाही, मामाच्या घरी राहून शिक्षण घेत आहे, मामाची परिस्थिती हालाखीची आहे. कुमारी निकिता अशोक तोरडमल, पार्डी पुसद वर्ग दहावा वसंतराव नाईक विद्यालय पुसद, वडील नाही आई मजुरी करते. कु पूजा मारोती दानकरी, वर्ग दहावा श्री शिवाजी विद्यालय सवना वेणी धरण, वडील नाही, आई रोजमजुरी करते.कु आसावरी विश्वास खंदारे,लिंबी पुसद वर्ग अकरावा वसंतराव नाईक विद्यालय पुसद,वडील नाही आई मजुरी करते. या चार मुलींना नवीन सायकलचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

सायकलसाठी मदत करणाऱ्यां दात्यांची नावे संतोष तडकसे तीन हजार सहाशे एक सायकल,बाळू देशमुख तीन हजार सहाशे एक सायकल,प्राचार्य रजनी अशोक गायकवाड दोन हजार,सुनील नामदेव ठाकरे दोन हजार,शशिकांत जामगडे सर एक हजार दोनशे,राजू भाऊ ठाकरे हजार,एस बियाणी मार्केट एक हजार रुपये.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ हरिभाऊ फूपाटे ,प्रमुख पाहुणे राधेश्याम जांगिड,पंकजपाल महाराज, हरीश सेता,संतोष तडकसे, सुनील ठाकरे, रजनी अशोक गायकवाड, मंदा इंगोले, शुभांगी पानपटे, पंकज जयस्वाल,दिगंबर जगताप,परशराम नरवाडे वरील मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश धर्माळे सर यांनी केले,यावेळेस माणुसकीच्या भिंतीचे गजानन जाधव, जगत रावल,संतोष गावंडे, सोहम नरवाडे, संदीप आगलावे, मोनिका जाधव,मोना रावल, अर्चना गावंडे, रेखा आगलावे, प्रियंका बेले, जगदीश रावल, दीपक घाडगे, प्रमोद ठाकूर, संतोष जाधव, आदित्य जाधव, रामचंद्र जाधव, दत्तात्रेय जाधव,सचिन भिताडे, सचिन बाभुळकर, गोपाल सुरोशे, दीपक काळे,दिपक महाडिक, संजय रेखावार, मनोहर बोंबले, रमेश चव्हाण, प्रशांत देशमुख, बळवंत मनवर,अशोक बंजरे,किशोर पानपट्टी, विवेक मन्नलवार,भगवान जाधव, सुभाष देशमुख, चंद्रकांत ठेंगे,मनोहर बोंबले,अरविंद देशमुख,निलेश पेन्शनवार व पुसद परिसरातील सर्व शिवप्रेमी उपस्थित होते….