भरोसा नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेक अनादर प्रकरणी एकास दंडासह सहा महिने कारावासाची शिक्षा….
पुसद:प्रतिनिधी:
येथील भरोसा नागरी सहकारी पतसंस्थेचे कर्जदार ईरफान सुरैच्या यांनी पतसंस्थेकडून घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीसाठी पुसद अर्बण सहकारी बँकेचा चेक रुपये एक लाख भरोसा नागरी सहकारी पतसंस्थेस दिला होता. सदर चेक कर्जदार ईरफान सुरैय्या यांचे खात्याम पुरेसे पैसे नसल्यामुळे दि.७ जानेवारी २०१५ रोजीचेक परत आला होता.
या प्रकरणात भरोसा नागरी सहकारी पतसंस्थेने महागाव न्यायालयात कलम १३८ अंर्तगत प्रकरण क्रं ७८/20१५ दाखल केले होते.
सदर प्रकरणात भरोसा नागरी सहकारी बँकेचे वसुली अधिकारी विनोद शिंदे यांचा पुरावा न्यायालयाने ग्राहृय मानून दि२२ मार्च २०२२रोजी कर्जदार आरोपी ईरफान सुरैय्या यांना चेक अनावरण प्रकरणी दोषी ठरवुन १लाख ६२हजार रुपये व सहा महिन्याची साधी कैद अशी शिक्षा दिली. पतसंस्थेतर्फे अॅड सुदर्शन देशमुख यांनी कामकाज पाहिले .या फौजदारी प्रकरणात भरोसा सह नागरी पतसंस्थचे अधिकारी
विनोद शिंदे व अध्यक्ष अॅड. विवेक भैय्यासाहेब देशमुख यांनी न्यायालयात पुरावा दिला. आरोपीतर् कर्जदार ईरफान सुरैय्या व पतसंस्थेचे माजी व्यवस्थापक श्रावण जाधव यांनी बयाण दिले. आरोपीलचे वकिल अँड जहिरखान आणि संजय राठोड यांनी कामकाज पाहिले. महागाव न्यायालयातील चेक बाउंस प्रकरणी शिक्षा होण्याची प्रथमच केस असुन हा न्यायनिर्णय न्यायाधिश संतोष भांगे यांनी जाहिर केला .
या निर्णयामुळे चेक अनादरण प्रकरणातील नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे…